आमच्या बद्दल थोडेसे
संस्कृती आणि विद्येचे माहेरघर म्हणून जगविख्यात असणा-या पुणे शहराजवळ असणा-या व श्री. सोमेश्वर, श्री. वाकेश्वर इ. देवस्थाने जिच्या तीरावर आहेत अशा ऐतिहासिक महत्व असणा-या रामनदीच्या तीरावर वसलेले पाषाण हे गाव, जे आता पुण्याचे एक उपनगर म्हणून नावारुपाला येत आहे. ह्याच गावातील पेशवेकाळापासून पाषाण, बावधन, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी ह्या पंचक्रोशीचे ग्रामजोशी (ग्रामपुरोहित) म्हणून मान्यता पावलेले असे एक कुटुंब म्हणजे ढेरे कुटुंब.
पेशवेकाळापासूनचा हा पौरोहित्याचा वारसा चालू ठेवला आहे आत्ताच्या पिढीतील श्री. सुमीत गजानन ढेरे यांनी. श्री. सुमीत गजानन ढेरे इ.स. २००१ पासून पौरोहित्य करत आहेत.
- पुणे विद्यापीठातून बी. ए. संस्कृत
- चिंचवड देवस्थान ट्रस्ट च्या वेदपाठशाळेत वेदाध्ययन
- वास्तुशास्त्रतज्ञ – वास्तुभूषण, वास्तुआचार्य पदवीने सन्मानित
- पेंड्युलम डाऊझिंग (Certified Dowser )
- जिओपॅथिक स्ट्रेस सल्लागार
- इंडॉलोजी अभ्यासक (मूर्तीशास्त्र व मंदिरस्थापत्य शास्त्र )
विविध पुजा / विधी